आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्प साठा:प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा; 54 प्रकल्पांतच साठा

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून ते ऑगस्ट या कालावधीत पावसामध्ये यंदा सातत्य राहिले नाही. मागील तीन आठवड्यांपासून पावसाने मोठी उघडीप दिली. त्याचा परिणाम प्रकल्पीय पाणीसाठ्यावर झाला आहे. १ सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील गोदावरी व कृष्णा खोऱ्याअंतर्गत असलेल्या १४३ प्रकल्पांत आता ५४.९६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. माजलगाव हे एकमेव मोठे धरण ५९.४९ टक्के भरलेले आहे. उर्वरित लघू आणि मध्यम प्रकल्पांत मोठ्या पाणीसाठ्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात यंदा सुरुवातीला जूनमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या लगबगीने उरकल्या. पिके जोमाने वाढू लागली. मात्र याच दरम्यान पावसाने पाठ फिरवली. याचा फटका पिकांच्या वाढीला झाला. परिणामी अनेक ठिकाणी खरिपातील पिके सुकून गेली. आता गणेश चतुर्थीपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांंना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही मोठ्या पावसाची गरज आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने दिलेल्या साप्ताहिक पाणीसाठा अहवालानुसार आता जिल्ह्यातील १४३ प्रकल्पांमध्ये ५४ टक्के पाणी उपलब्ध आहे. ३८ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. ३४ प्रकल्पच शंभर टक्के क्षमतेने भरलेले आहेत. उर्वरित प्रकल्पांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात आटला आहे.

बातम्या आणखी आहेत...