आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरित:सहाय्यकाचे निवृत्तीवेतन तातडीने वितरित; हजेरी सहायकांचा 30 वर्षांचा प्रश्न मार्गी

बीड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायिक तत्त्वाप्रमाणे हजेरी सहाय्यक पदावरील सेवाकाल नियमित करून सेवानिवृत्त हजेरी सहाय्यकाचे निवृत्तीवेतन तातडीने वितरित करावे, असे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. सहाय्यक पदावरील सेवाकाल नियमित करून निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरणे संदर्भात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कक्षात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी संघटनेचे नेते तथा माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस विजयरावजी गव्हाणे यांच्यासह ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद, तसेच अन्य विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दहा जिल्ह्यात हजेरी सहाय्यकांना १ ऑक्टोबर १९८८ पासून सेवा गृहीत धरून ९ डिसेंबर १९९५ पासून फरका सहित सेवानिवृत्ती चा लाभ देण्याचे मान्य केले आहे.

तसेच सर्व सचिवांना आदेश देऊन आयुक्तांना पत्र करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सेवानिवृत्त वेतन वितरित होत आहे. परंतु अन्य जिल्ह्यात न्यायिक तत्वाप्रमाणे हजेरी सहायकांच्या पदावरील सेवाकाल नियमित करून निवृत्तीवेतन ग्राह्य धरण्यास संदर्भात प्रशासनाद्वारे हेतू ता उदासीनता दाखविली जात आहे, असे नमूद केली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दहा जिल्ह्याप्रमाणेच अन्य जिल्ह्यांमध्ये कार्यवाहीचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...