आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधील शिवसेना आक्रमक:संजय राऊतांवरील कारवाईचा निषेध

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांच्यावर ईडीकडून झालेल्या कारवाईनंतर बीडमधील शिवसेना आक्रमक झाली असून धानोरा रोड येथे जिल्हा संघटक रतन गुजर यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त केला गेला. याप्रसंगी रतन गुजर म्हणाले की, जनतेने भाजपाला सत्तेत बसवले ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. परंतु प्रत्यक्षात तसे काहीही न होता जो भाजपामध्ये येणार नाही. त्याच्या मागे ईडी लावून सुड आणि द्वेषभावनेने कारवाई केली जाते.

त्यामुळे जनतेला देखील सबसे बडी भूल कमल का फुल असे आता वाटू लागले आहे. किरीट सोमय्या हे इतर नेत्यांवर चिखलफेक करतात भाजपामधील लोकांच्या मागे ईडी का लागत नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी शिवसैनिक राजु चोपडे, निखील लोखंडे, बहिरवाळ हनुमान, प्रकाश गोकुळे, सुरेश जगताप, रफीक पठाण, अण्णासाहेब वाघचौरे, सानप, भीमराव मिसाळ, फुंदे, राजू वडमारे, राजू गायकवाड, कल्याण निर्मळ, शरद भराट यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...