आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. यासाठी सोमवारी दिंद्रुड पोलिस ठाणे येथे दोघांच्या विरोधात सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेली घटना ताजी असताना, राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा जाेतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. राज्यभर याचे पडसाद उमटत आहेत.
दिंद्रुड येथे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सत्यशोधक ओबीसी परिषद व शिव-फुले-शाहू-आंबेडक र प्रेमी यांच्या वतीने भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी मुख्यमंत्री यांनी राष्ट्रपतींकडे करावी व महाराष्ट्र सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळातून तात्काळ काढावे. अशी मागणी करुन पोलिसांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी डीपीआयचे माजलगाव तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, रिपाइंचे माजलगाव तालुका उपाध्यक्ष बाबा देशमाने, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे धारूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब सोनटक्के, रामेश्वर उबाळे, अतुल चव्हाण, सुनील वावळकर, रिपाइंचे वामन पाईक आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.