आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:आज राज्यपालांविरोधात आंदोलन

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आज सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर कांदे भरलेली काळी टोपी जाळून आंदाेलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना आताच्या नेत्यांशी केली होती.

यावरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे. कोश्यारी यांच्याबद्दल शिवप्रेमींमधून संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून कोश्यारींविरोधात आंदोलन हाती घेतले गेले आहे. आज सोमवारी राज्यभरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रत्येक तालुक्यात कांदे भरलेली काळी टोपी जाळून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी दिली. राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन शेख यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...