आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलभरो:गायरान जमिनीच्या प्रश्नावर रिपाइंकडून धरणे आंदोलन ; सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दलित, भुमिहिन, आदिवासी, पारधी, गावकुसा बाहेरील उपेक्षित भूमिहीन लोकांच्या ताब्यात असणाऱ्या गायरान जमिनी शासनाने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. दलितांना गायरान जमीनी काढण्या संदर्भात नोटीसा दिल्या जात आहेत. परंतु आम्ही सरकारला एक इंचही गायरान जमीन परत घेऊ देणार नाहीत. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, सरकारने दलितांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा यापुढे जेलभरो आंदोलन केले जाईल.असा इशारा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला.

महाराष्ट्रासह देशभरात गायरान धारकांच्या न्यायिक हक्काच्या आणि अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात रिपाइंने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी महाधरणे आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून निघालेल्या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देवून सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. सर्व बाबींचा सरकारने विचार करून सुमोटो याचिके विरूध्द रिटपीटीशन करावे. ३० तारखेला जिल्ह्यातील सर्व तहसिलसमोर रिपाइं आंदोलन करणार आहे. या आंदोलनात राजू जोगदंड, किशन तांगडे, भास्कर रोडे, राणी गायकवाड, रेश्मा जोगदंड यांच्यासह महिलांचा आंदोलनात सहभाग हाेता.

बातम्या आणखी आहेत...