आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाने गॅस सिलिंडरच्या दरात केलेली वाढ आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळत नसलेला भाव यामुळे केंद्र शासनाच्या निषेधार्थ सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर कांदाभजी तयार करुन अनोखे आंदोलन केले. शासनाने स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ५० रूपये तर व्यावसायिक सिलिंडर ३५० रुपयांनी दरवाढ केली असून अगोदरच पेट्रोल, डिझेल आदिंच्या वाढलेल्या किमतीमुळे जनता त्रस्त असुन सर्वच जीवनावश्यक वस्तुंमध्ये दरवाढ होऊन महागाई वाढणार असुन जगणे मुश्किल होणार असून दरवाढ रद्द करण्यात यावी.
कांद्याचे भाव गडगडल्या मुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. यावेळी डाॅ.गणेश ढवळे, रामनाथ खोड, किष्किंधा पांचाळ, सय्यद सालिहा, शेख युनुस, मिलिंद सरपते, बलभीम उबाळे, शेख मुबीन, शेख मुस्ताक, रमाकांत रेवणवार यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.