आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:पाटोद्यात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा

पाटोदा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई यासहअनेक मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेगुरुवारी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा धडकला यावेळी शेतकरी आपल्या मागण्यांसाठी प्रचंडआक्रमक झाले होते. परतीच्या पावसात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल आहे अशा परिस्थितीत पंचनामे व इतर फारचकरण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने ठोस मदत द्या या मागणीस सह इतर मागण्यांसाठीआमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील शेतकऱ्यांचा महाआक्रोश जनआक्रोश मोर्चा पाटोदा उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आला. हजारो शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेऊन आपल्या संतप्तभावना व्यक्त केल्या.

या मोर्चात आमदार बाळासाहेब आजबे , माजी आमदार साहेबराव दरेकर, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, रामकृष्ण बांगर, जिपचे माजी अध्यक्ष शिवाजीराऊत, सतीश शिंदे, दीपक घुमरे, अप्पासाहेब राख, विष्णुपंत घोलप, काकासाहेब शिंदे, महादेव नागरगोजे, जुबेर चाऊस, सुनील नाथ, अण्णासाहेब चौधरी, विश्वासनागरगोजे, शिवभूषण जाधव, गणेश कवडे, नीला पोकळे आदींसह आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघातून हजारो शेतकरी सहभागी झाले होते यावेळी प्रशासनालाशेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...