आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत वेतन:कंत्राटी कर्मचाऱ्यांचे‎ पालिकेला टाळे ठोकून आंदोलन‎

गेवराई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई येथील नगर पालिकेतील कंत्राटी‎ कामगारांच्या वतीने आमचे गेल्या चार‎ महिन्यापासून थकीत पेमेंट देण्यात यावे‎ यासाठी शुक्रवारी दुपारी जवळपास दीड‎ तास हल्लाबोल आंदोलन करण्यात आले‎ होते यावेळी प्रशासकीय अधिकारी यांनी‎ लेखी माहिती दिल्यानंतर आंदोलन मागे‎ घेण्यात आले.‎ गेवराई नगर परिषदेला स्वच्छतेचे अनेक‎ राष्ट्रीय पुरस्कार या नगर परिषदेला प्रदान‎ करण्यात आलेले आहेत. दरम्यान गेवराई‎ शहरातील घनकचरा व्यवस्थापन या‎ बाबतीत गेवराई नगर परिषदेच्या वतीने‎ जवळपास ९० कंत्राटी कामगार नेमलेले‎ कसून यामध्ये २४ महिला आहेत दरम्यान‎ शहरातील सर्व भागातील घनकचरा‎ व्यवस्थापन करण्यासाठी हे सर्व कामगार‎ सकाळी उपलब्ध होऊन नियोजन करतात.

‎ मात्र या सर्व ९० कंत्राटी कामगारांचे‎ मिळालेल्या माहितीनुसार १६ हजार दरमहा‎ प्रमाणे चार महिन्याचे वेतन थकीत‎ असल्याने व नगर परिषद टाळाटाळ करत‎ आहेत म्हणून शुक्रवारी दुपारी एक‎ वाजण्याच्या सुमारास रोजंदारी मजुर सेना‎ यांच्या वतीने नगर परिषद गेटजवळ येऊन‎ नगर परिषदेला टाळे ठोकून हल्लाबोल‎ आंदोलन करण्यात आले. दरम्यान आम्ही‎ पंधरा वित्त आयोग यांच्या कडे मागणी केली‎ असून निधी उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ‎ संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात येईल असे‎ प्रशासकीय अधिकारी विष्णू तिडके यांनी‎ सांगितले. जवळपास अर्धे पैसे आम्ही‎ कंत्राटी कामगारांना दिले असून इतर निधी‎ जमा झाल्यावर तात्काळ देण्यात येईल असे‎ कंत्राटी कामगार मुकादम विष्णू आतकरे‎ यांनी सांगितले‎

बातम्या आणखी आहेत...