आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली.
सरकारने गेल्या दोन वर्षांपासून नियमित लष्करी भरती केली नाही. त्यामुळे २०२१ पर्यंत भारतीय सैन्यात १ लाख ४ हजार ६५३ जवानांची कमतरता होती. ही पदे भरण्याऐवजी सरकारने आता प्रादेशिक कोटा पूर्णपणे काढून टाकण्याचा आणि ६ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसह चार वर्षांच्या अल्पकालीन अग्निपथ भरती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. चार वर्षांनंतर सुमारे तीन चतुर्थांश (३५ हजार) सैनिक पेन्शन किंवा ग्रॅच्युइटीशिवाय निवृत्त होतील. या धोरणामुळे दरवर्षी अंदाजे ३५ हजार तरुण बेरोजगार होतील. या धोरणाचा परिणाम म्हणून देशातील नोकऱ्यांची सुरक्षितता आणि आर्थिक स्थैर्य पूर्णपणे नष्ट होण्याची खात्री आहे. या धोरणाद्वारे सरकारने जगातील भांडवलदारी, साम्राज्यवादी शक्तींना प्रशिक्षित बेरोजगार सैनिकांच्या भरतीसाठी दरवाजेदेखील खुले करून दिले आहेत.
या आंदोलनात डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष मोहन जाधव, जिल्हा सचिव विशाल देशमुख, एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, जिल्हा सचिव लहू खारगे, विष्णुपंत देशमुख, विनायक चव्हाण, संतोष जाधव, सुहास जायभाये, डॉ. कुंडलिक खेत्री, जगन चव्हाण, संगमेश्वर आंधळकर, पंडित तुपे, मल्हारी जाधव, अभिषेक शिंदे, आनंद भालेराव, सुरेश जाधव आदी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.