आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:दिव्यांग महामंडळाला निधी‎ द्या; प्रहार संघटनेची मागणी‎

धारूर‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग महामंडळाचे भागभांडवल वाढवले‎ असले तरी प्रत्यक्षात निधी मिळत नसल्यामुळे‎ गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांना‎ कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज मिळत नाही.‎ दिव्यांग वित्त विकास महामंडळामार्फत‎ नियमितपणे वित्त पुरवठा करण्यात यावा, अशी‎ मागणी जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने‎ जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी केली आहे.‎ महामंडळाकडे गेल्या चार-पाच वर्षापासून‎ अनेक दिव्यांगाची कर्ज प्रकरणे मंजुरीच्या‎ प्रतीक्षेत आहेत.

तसेच काही प्रकरणे मंजूर‎ असूनही त्यांना अर्थ सहाय्य मिळालेले नाही‎ अशी स्थिती आहे. त्याचप्रमाणे थेट ५० हजार‎ रुपये कर्ज योजना व्यवसायासाठी फिरते वाहन‎ योजना यांसह दिव्यांगाना सुरू करायच्या‎ व्यवसायासाठी कोणत्याही योजनेचे अर्ज‎ जिल्हा कार्यालयाकडे उपलब्ध नाहीत.‎ नुकतेच महामंडळाचे भागभांडवल ५० कोटी‎ वरून ५०० कोटी केले. मात्र, या निर्णयाच्या‎ अंमलबजावणीसाठी मुख्यालयाकडून योग्य ती‎ कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

दिव्यांग वित्त‎ विकास महामंडळाच्या सर्व योजनांचे अर्ज‎ सर्व जिल्हा कार्यालयात उपलब्ध करून‎ देण्यात यावेत, गेल्या चार-पाच वर्षातील पात्र‎ दिव्यांगाचे प्रलंबित अर्ज तत्काळ निधी देऊन‎ निकाली काढून मंजूर करावेत व दिव्यांगाना‎ व्यवसाय करण्यासाठी वित्त पुरवठा करावा,‎ अशी मागणी जिल्हा प्रहारच्या वतीने‎ जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी प्रसिद्धी‎ पत्रकाद्वारे केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...