आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:चुंभळी फाट्यावर प्रवाशांसाठी निवाऱ्याची सोय करा : डॉ. तांदळे

पाटोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चुंभळी फाटा या रस्त्यावर प्रवाशांचे निवारा नसल्याने अतोनात हाल होत आहेत. हे ठिकाण म्हणजे वर्दळीचे आणि प्रवाशांच्या थांब्याचे ठिकाण असून या ठिकाणावरून प्रवाशी पाटोदा तालुक्यातील विविध गावात जात - येत असतात. तसेच बीडकडेही जाणार्‍या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु या ठिकाणी प्रवाशांना उन्ह, वारा, पाऊस या पासून संरक्षण मिळावे यासाठी असा कोणताही निवारा नसल्याने गैरसोय निर्माण झाली आहे. तरी संबंधीत प्रशासनाने याची त्वरीत दखल घेवून निवारा उभारावा अशी मागणी पाटोदा तहसिलदार रुपाली चौघुले यांना साह मे रोजी निवेदनाद्वारे डॉ. संजय तांदळे यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षामध्ये चुंभळी फाटा येथे प्रवाशांसाठी निवारा करण्या बाबत सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्यावतीने तीन वेळा उपोषण करून संबंधीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. तसेच मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ, हमीदखान पठाण यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत परिवहन मंत्र्यांना निवार्‍याची सोय करण्या बाबत निवेदन दिलेले होते. तसेच चुंभळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी देखील वेळोवेळी निवार्‍यासाठी आंदोलन केलेले आहे.

उन्हामुळे अनेक प्रवाशांना चक्कर येणे, उन्हघाम होणे, उष्माघात होणे असे प्रकार घडलेले असून याकडे प्रशासनाने पुर्णत: दुर्लक्ष केलेले आहे. काही दुर्दैवी घटना घडल्यास त्यास प्रशासन पूर्णत: जबाबदार राहील त्यामुळे प्रशासनाने या निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी व निवार्‍याची व्यवस्था करावी. नसता लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ता संघटना जिल्हाध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांनी दिला असून निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड व परिवहन राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आल्या आहेत. या निवेदनावर पाटोदा येथील शेख जावेद रज्जाक, शेख खालेद रज्जाक, श्रीरंग लांडगे, एम.डी. सुरवसे, अशोक नागरगोजे, सुजीत वाल्हेकर, मोहन नागरगोजे, जावेद चाऊस, मयूर वीर, अजिनाथ घुले आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातम्या आणखी आहेत...