आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त तैनात:जिल्ह्यात 1611 ठिकाणी सार्वजनिक‎ होळी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त‎

बीड‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सोमवारी दि.६ राेजी १‎ हजार ६११ ठिकाणी सार्वजनिक‎ होळी पेटणार आहे. अतिउत्साहात‎ होळीच्या रंगाचा बेरंग होऊ नये‎ यासाठी पोलिस दलाकडून होळी‎ आणि धुळवड असे दोन दिवस‎ जिल्ह्यात बंदोबस्त तैनात करण्यात‎ आला तर, उपद्रवींवरही प्रशासनाची‎ नजर असणार आहे. सोमवारी‎ जिल्हाभरात होळीचा सण साजरा‎ केला जाणार आहे. कोरोनाच्या दोन‎ वर्षानंतर यंदा सर्वच सण निर्बंध‎ मुक्त वातावरणात होत असल्याने‎ मोठा उत्साह दिसून येत आहे.‎ होळीच्या सणालाही जिल्ह्यात १‎ हजारी ६११ ठिकाणी सार्वजनिक‎ होळी पेटणार आहे.

यात वाडी,‎ तांडे, वस्तीवर ७८९ ठिकाणी, प्रमुख‎ शहरांत १४२ ठिकाणी तर, गाव‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पातळीवर ६८० ठिकाणी सार्वजनिक‎ होळी पेटणार आहे. होळी आणि‎ धुळवड या दोन दिवशी मद्यपींची‎ संख्या वाढत असते. दारू पिऊन‎ वाद होण्याचे प्रमाण मोठे असते तर‎ काही ठिकाणी अंगावर रंग‎ टाकण्यावरुनही वाद होतात. हे होऊ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून‎ पोलिस ठाणे स्तरावरुन बंदोबस्त‎ लावण्यात आला आहे. दीड हजार‎ पोलिसांचा बंदोबस्त जिल्ह्यात‎ राहणार असून शहरातही विविध‎ ठिकाणी फिक्स पॉइंट करण्यात‎ आले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...