आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय कवी‎ संमेलन:कवयित्री शर्मिला देशमुख़- घुमरे यांच्या‎ ''या वळणावर'' काव्य संग्रहाचे प्रकाशन‎

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूरच्या‎ वतीने यंदा वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या‎ औचित्य साधून ''भेट मराठी मनाची'' हा राज्यस्तरीय कवी‎ संमेलन व पुस्तक प्रकाशन समारंभ डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, ऊरूवेला कॉलनी, वर्धा‎ रोड, नागपूर येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. या‎ प्रकाशन समारंभात बीडच्या कवयित्री शर्मिला देशमुख‎ घुमरे यांच्या ''या वळणावर'' काव्य संग्रहाचे प्रकाशन‎ मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडले. काव्य संग्रहाचे‎ प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष व उद्घाटन प्रभाकर‎ दहिकर, सुधाकर भुरके, ज्येष्ठ प्राजक्ता खांडेकर, प्रदीप‎ ढोबळे, डॉ. संजय पाचभाई, विजय शिर्के, नागोराव‎ कोम्पलवार, द्रवेश जनबंधू, संतोष राऊत, संग्राम‎ कुमठेकर, रंजना ब्राम्हणकर, गोंदिया व संस्थेच्या सचिव‎ पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी‎ मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेच्या वतीने शर्मिला‎ देशमुख यांचा शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन‎ अध्यक्ष राहुल पाटील व पल्लवी पाटील यांच्या हस्ते‎ करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...