आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड शहरात होमिओपॅथिक वैद्यकीय व्यवसायातून आपली ओळख निर्माण करणारे आणि आणि औरंगाबाद येथील सायली ट्रस्ट कॉलेज ऑफ होमिओपॅथिक महाविद्यालयात अॅनाटॉमी अर्थात शरिररचना शास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ.एस.पी.लड्डा यांंचे शरिररचना शास्त्र या विषयाचे सहज, सोप्या व सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेतील ‘इजी अॅनाटॉमी फॉर एक्झाम प्रिपरेशन’ या अत्यंत उपयुक्त आणि माहितीपुर्ण पुस्तकाचे येत्या १४ मे २०२२ रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. औरंगाबाद येथील एमजीएम कॉम्प्लेक्स येथील ‘रुक्मिणी ऑडीटोरियम’मध्ये हा शानदार कार्यक्रम पार पडणार आहे. बीडच्या भूमिपुत्राचे हे शरिररचनेसंबंधीचे अभ्यासपूर्ण पुस्तक भारतासह अमेरिका, युरोप या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या सर्व पॅथीच्या प्रथमवर्ग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांपर्यत पोहचणार आहे. पुस्तकातील प्रकरणे एका सोप्या शैलीत तयार केली गेली आहेत ज्यात सर्व लहान आणि मोठ्या प्रश्नांची उत्तरे ही अगदी उक्त संदर्भासह मांडली आहेत. सुमारे ३०० दोन गुणांचे प्रश्न आहेत, सर्व पाच आणि दहा गुणांचे प्रश्न आणि मोठे उत्तरे असलेले प्रश्न सोप्या उत्तरांसह लिहिलेले आहेत ज्यात लक्षात ठेवण्याच्या टिपा आणि आकृती काढण्याच्या सोप्या पद्धतींचा समावेश आहे. या पुस्तकात मानवी शरीरशास्त्राची प्रत्येक प्रणाली सहज समजण्यायोग्य आकृत्या सह चांगल्या प्रकारे समजावून सांगितली आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र विषयाची भीती घालवण्यासाठी नक्कीच मदत करेल. परीक्षेच्या तयारीसाठी इझी अॅनाटॉमी या पुस्तकाचा मुख्य उद्देश म्हणजे विषयांची सोपी समज प्रदान करणे, अॅनाटॉमी विषयाबरोबर मैत्री करणे आणि सर्व वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने परीक्षा उत्तीर्ण करणे. वैद्यक शास्त्रातील विविध शाखांमध्ये अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक हे अतिशय महत्वाचे ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.