आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौडबंगाल:नगर पोलिसांनी गुन्हे नोंदवलेले वाळू माफिया आष्टीच्या महसूलने केले पंच!

आष्टी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आष्टी महसूलच्या पथकात सेवानिवृत्त कर्मचारी, वादानंतर आता नवा प्रकार समोर

वाळू माफियांवर कारवाई करताना आष्टी व नगर पोलिसांत हद्दीवरून झालेल्या वादानंतर आता नवा प्रकार समोर आला आहे. नगरच्या कर्जत पोलिसांनी ज्या वाळू माफियांवर गुन्हे नोंद केले त्यानांच आष्टीच्या महसूल प्रशासनाने आपल्या पंचनाम्यात पंच म्हणून घेतले आहे. वाळू वाहतुकीवर कारवाई करताना वाळू माफियांनाच पंच केल्याने आष्टी महसूलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

आष्टी व कर्जतच्या सीमेवरील सीना नदीपात्रात सांगवी येथे २१ मार्चला अवैध वाळू उपसा केला जात होता. कर्जत पोलिसांनी ५ तास पाठलाग करून या वाळू माफियांचे ४ ट्रॅक्टर, १ जेसीबी पकडला होता. याची माहिती मिळताच आष्टीच्या महसूल पथकाने धाव घेत ही नदी आमच्या हद्दीत येत असल्याचे सांगून कर्जत पोलिसांना कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न केला. ना. तहसीलदार बाळदत्त मोरेंनी ही कारवाई आष्टी महसूल पथक करेल असे सांगितले. मात्र, कर्जत पोलिसांनी हे लोक नगर जिल्हा हद्दीत वाळू उपसा करत होते, कारवाई करताच ते पळाले. पाठलाग करत पोहोचलो असून ही कारवाई आम्ही करू असे सांगितले. हद्दीवरून हा वाद झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी सागर बाजीराव खेडकर, विनोद बाजीराव खेडकर, शरद मच्छिंद्र खेडकर, उमेश खेडकर, जयसिंग खेडकर, संदीप वारे यांच्यासह ३० अनोळखी व्यक्तींवर गुन्हाही नोंद केला. कर्जत पोलिसांच्या या कारवाईनंतर आष्टी महसूल प्रशासनानेही पंचनामा केला. मंडळ अधिकारी शिवप्रकाश सिंघनवाड यांनी पंचनामा करताना नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केलेले सागर बाजीराव खेडकर, विनोद बाजीराव खेडकर, शरद मच्छिंद्र खेडकर, उमेश खेडकर, जयसिंग खेडकर यांच्यासह १० जणांच्या पंच म्हणून स्वाक्षऱ्या घेतल्यात. त्यामुळे एकाच कारवाईत तेच आरोपी व तेच पंच असे वेगळेच समीकरण झाले .

महसूलच्या पथकात सेवानितृत्त कर्मचारी
२१ मार्च रोजी सांगवी आष्टी येथे अवैध वाळू वाहतुकीच्या कारवाईसाठी जाणाऱ्या पथकात आष्टी तहसीलचे नायब तहसीलदार बाळदत्त मोरे, टाकळसिंग महसूल मंडळाचे मंडळाधिकारी शिवप्रकाश सिंघगवाड व आष्टी तहसीलचे सेवानिवृत्त दफेदार हौसराव वाल्हेकर या तिघांचा समावेश होता. परंतु हौसराव वाल्हेकर ३१ डिसेंबर २०२१ रोजीच सेवानिवृत्त झाले आहेत. तरीही त्यांना कोणत्या अधिकाराने कारवाईसाठी नेले हे न उलगडणारे कोडे आहे.

चौकशी करून कारवाई करू
एखाद्या कारवाईत पंच दोन असतात, साक्षीदार म्हणून अनेकांच्या सह्या असतात. चौकशी करून याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल. आष्टीतील वाळूचा विषय माझ्यासाठी चिल्लर असून मी अनेक मंत्र्यांच्या तालुक्यात काम केलेले आहे.
-विनोद गुंडमवार, तहसीलदार, आष्टी

बातम्या आणखी आहेत...