आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडा शर्यत:शर्यतीच्या नियोजनासाठी पुण्याची टीम बीडमध्ये दाखल; बैलगाडा शर्यतीचा 1 जुलैला उडणार धुरळा

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बीडमध्ये प्रथमच राज्यस्तरीय ‘दिलदार राजा’ बैलगाडा शर्यत शुक्रवारी (१ जुलै) होणार आहे. या शर्यतीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावनोंदणी सुरू असून शर्यतीच्या नियोजनासाठी पुण्याची टीम बीडमध्ये दाखल झाली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील राजेंद्र मस्के मित्रमंडळाच्या वतीने चौरे वस्ती तळेगाव शिवारात १ जुलैला बैलगाडा शर्यत स्पर्धा होणार आहे.

नियोजनासाठी पुण्याहून आलेल्या टीमच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (२३) श्रीफळ फोडून मैदानाचा शुभारंभ केला. याप्रसंगी किरण साकोरे, रोहिदास ठाकूर, राहुल जगताप, सचिन काकडे, सागर गावडे, संभाजी वागसकर, गणेश फिरंगे, उत्रेश्वर घोडके, दीपक जाधव, महेश मस्के, प्रल्हाद चित्रे, बद्रीनाथ जटाळ, केदार इंदोरे, बप्पा इंदोरे, राकेश बिराजदार, अजय ढाकणे, बाळासाहेब गात, नानासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. स्पर्धकांनी भाजप जनसंपर्क कार्यालय, नगर रोड, बीड येथे नावनोंदणी करावी.