आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पाटोद्यात नियम मोडणाऱ्या 40 वाहनांवर दंडात्मक कारवाई‎

पाटोदा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतुकीचे नियम धाब्यावर‎ बसवत रस्त्यावरून सुसाट वाहने‎ चालवणाऱ्यांना ४० वाहनचालकांवर बीड‎ वाहतूक पोलिस व पाटोदा पोलिसांनी पाटोदा‎ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात‎ संयुक्तपणे कारवाई केली आहे.

बीड वाहतूक‎ पोलिस पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक‎ जी. ए. जागडे व पाटोदा ठाण्याचे पोलिस‎ उपनिरीक्षक राहुल पतंगे, वाहतूक पोलिस‎ मदन क्षीरसागर, हवालदार संजय भुतके,‎ डोईफोडे, उगलमुगले यांनी पाटोदा शहरातील‎ छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी‎ नियम धाब्यावर बसवुन वाहतुक करणाऱ्या‎ ४० वाहनांवर कारवाई केली आहे. शनिवारी‎ दुपारी साडेचार वाजेपर्यंत ही कारवाई सुरू‎ होती.‎‎

बातम्या आणखी आहेत...