आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पंजाब डख यांचा यंदाच्या पावसाबाबत अंदाज, गेवराईत शेतकरी परिसंवादास प्रतिसाद

गेवराई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजपर्यंत मी सांगितलेल्या अंदाजानुसार त्या त्या विभागात विविध ठिकाणी पाऊस पडत असून राज्यात यावर्षी तापमानातील वाढ व वाऱ्याच्या दिशा बदलामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराईचे काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश बेदरे यांच्या वतीने शहरातील सिंधी भवन येथे आयोजित शेतकरी परिसंवाद व मोफत बियाणे वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे, काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, कृषी उद्यान पंडित राजेंद्र आतकरे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बलभीम बोरवडे, मनोहर चाळक, शिरुर तालुकाध्यक्ष रमेश सानप, गणेश कराडे, संतोष निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डख यांनी सांगितले की, मी पावसाचा अंदाज सांगतो तेव्हा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करत असतो.

यावर्षी ही राज्यभरात चांगला पाऊस पडणार आहे. याचे मूळ कारण म्हणजे यावर्षी आलेला पाऊस हा पूर्वेकडून आलेला आहे. पूर्वेकडून आलेला पाऊस हा चांगला प्रकारे पडत असून यावर्षी मराठवाड्यासह राज्यात अतिशय चांगला पाऊस पडणार असून शेती करताना शेतकऱ्यांनी निसर्गाचा अंदाज घेऊन त्या मोसमनुसार योग्य ती पिके घेऊन भरघोस उत्पादन घ्यावे. गेल्या दोन वर्षपासून तापमान वाढ व वाऱ्याच्या बदलामुळे पावसाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या वतीने २०० शेतकऱ्यांना बियाणे वाटप
गेवराई येथे आयोजित परिसंवाद मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील २०० शेतकऱ्यांना मोफत कपाशी बियाणांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक महेश बेदरे यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल गिरी यांनी केले. बाळासाहेब आतकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर चाळक, संदीप खेत्रे, मधुकर वारे , बाबूराव पोटभरे, संतोष वाघमारे, अंकुश पाचपुते आदींनी प्रयत्न केले. महेश बेदरे यांच्या शेती, शेतकरी विषयक प्रयत्नांसाठी पंजाबराव डख यांनी विशेष कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...