आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबाजोगाई:पुसच्या शेतकऱ्याची द्राक्षे युरोपच्या बाजारात; 3 एकरांत 24 लाखांचे उत्पन्न

अंबाजोगाई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गतवर्षी याच तीन एकरांंत लॉकडाऊनमुळे निघाले उत्पन्न आठ लाखांचे; द्राक्षबागेमध्ये शेतकरी रविकांत खानापुरे.

वर्षभर मेहनत करून द्राक्षाची बाग फुलवली, मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यातच लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे तीन एकरांतील द्राक्षे स्थानिक व्यापाऱ्यांना व नागरिकांना विकावी लागली. या लॉकडाऊनचा फटका या शेतकऱ्याला बसला आहे. गतवर्षी केवळ आठ लाख रुपयांचे द्राक्षे शेतामध्ये निघाले. खर्च मात्र पंधरा लाखांचा झाला. या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला यावर्षी फळ विक्रेत्यांना मुभा मिळाल्यामुळे तीन एकरांतील द्राक्षे वीस टन युरोपच्या बाजारपेठेत गेल्यामुळे ४० रुपये किलोने महाराष्ट्रात विकणारे द्राक्षे त्यांनी युरोपमध्ये ८० रुपये किलो विकले आहेत. त्यामुळे त्यांना २४ लाखांचे उत्पन्न मिळाले अाहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये त्यांना मोठा फटका बसला होता.

पुस येथील रविकांत खानापुरे या शेतकऱ्याने गतवर्षी तीन एकरांमध्ये द्राक्षाची बाग फुलवली होती. खर्च ही द्राक्षाचा बहर येताच देशासह जगावर कोरोनाचे संकट ओढवले. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करावे लागले. त्यामुळे शेतीमालासह विदेशात जाणारी फळेदेखील जागेवरच सडून गेली. टरबूज, खरबूज, अंबा व द्राक्षांसारखी फळे लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या बेभावात विक्री करावी लागली. त्यामुळे फळबाग करणारे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. दहा लाख रुपये खर्च करून पुस येथील शेतकऱ्याने गतवर्षी तीन एकरात द्राक्षबाग फुलविली. द्राक्ष सेंद्रिय खतावर असल्यामुळे या फळांनादेखील विदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी होती.

परंतु गतवर्षीच्या मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे हवाई वाहतुकीसह सर्वच वाहतूक ठप्प झाल्यामुळे फळविक्रेत्यांना खर्चदेखील निघणे मुश्कील बनले होते. त्यातच काही शेतकऱ्यांनी तर बहरात आलेली फळे रस्त्यावर फेकून देण्याची त्यांच्यावर वेळ आली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाने तिसरा टप्पा गाठला अाहे. यात मृत पावणाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शेतीमालासह फळ विक्रेत्यांना लॉकडाऊनमधून मुभा दिल्यामुळे पुसच्या या शेतकऱ्याचे द्राक्ष युरोपच्या बाजारपेठेमध्ये गेल्यामुळे गतवर्षीच्या आठ लाखांच्या उत्पन्नापेक्षा यावर्षी २४ लाख रुपयांचे उत्पन्न द्राक्ष या फळातून मिळाले आहे.

... तर पर्याय उरला नसता
फळ निर्यातीला मुभा मिळाली नसती तर फळबाग शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसता. मागील वर्षी विदेशात मागणी असणारी द्राक्षे स्थानिक पातळीवर बेभावात विक्री करावी लागली, परंतु वर्षभरातील खर्च या फळ विक्रीतून निघाला नाही. गतवर्षीचीच परिस्थिती यावर्षीही राहिली असती तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नसता.

बातम्या आणखी आहेत...