आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केज:पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल करून स्टेट‌सला ठेवले; पतीवर गुन्हा दाखल

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्नीसोबत झालेल्या वादानंतर पतीचे कृत्य

पत्नीचे अर्धनग्न अवस्थेतील काढलेले फोटो पतीनेच तिच्या चुलत्याच्या व्हाॅट्सअॅपवर पाठवून स्वतःच्या व्हाॅट्सअॅपवर स्टेटस ठेवल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी केज पोलिसांत महिलेच्या तक्रारीवरून त्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

केज तालुक्यातील माहेर असलेल्या २२ वर्षीय विवाहितेस उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात दिले होते. ती सासरी नांदत असताना या महिलेच्या पतीने तिचे अर्धनग्न अवस्थेत फोटो काढले होते. दरम्यान, आता पती-पत्नीत बिनसल्यामुळे ही विवाहिता माहेरी वास्तव्यास आहे. दरम्यान, एकत्रित राहत असताना पतीने तिचे काही अर्धनग्न फोटो काढले होते. २४ डिसेंबर रोजी दुपारी १.४९ वाजेच्या सुमारास पतीने या महिलेच्या चुलत्याच्या व्हाॅट्सअॅपवर हा फोटो पाठवला. दुसऱ्या दिवशी २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याने हा फोटो त्याच्या व्हाॅट्सअॅपवर स्टेटस ही ठेवले. हा प्रकार निदर्शनास येताच पीडित महिलच्या फिर्यादीवरून तिच्या पतीविरुद्ध केज पोलिसांत विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...