आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत:विद्यार्थ्यांचा सवाल...साहेब, तुम्हीच सांगा थर्माकोलवरून शाळेत जायचे तरी कसे

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्तीवरील शालेय मुले व ग्रामस्थांना थर्माकोलवरून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ तहसील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच आली आहे. तात्काळ रस्ता करावा व संबधित प्रकरणात तहसीलदार चौगुले सह इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी चप्पु चलाओ धरणे आंदोलन केले.

उपविभागीय आधिकारी व तहसीलदार यांनीच शिंदेवस्तीवरील ग्रामस्थांच्या वारंवार निवेदन, आंदोलनानंतर कारवाई न करता वेठीस धरले असुन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातच घेण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि. १९ डिसेंबर सोमवार रोजी शिंदेवस्तीवरील ग्रामस्थांसह चप्पु घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आंदोलनात शेख युनुस च-हाटकर, शेख मुबीन, सय्यद आबेद, मुश्ताक शेख, हमीदखान पठाण, बलभीम उबाळे सुखदेव सानप आदि सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...