आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:वराह चोरीवरून पेठ बीडमध्ये राडा; माजी सभापतींसह 20 जणांवर गुन्हा

बीड2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दोन गटांत तुंबळ हाणामारी, दगडफेक अन् तोडफोडही केली

वराह चोरीच्या कारणावरून शिवीगाळ केल्याने शहरातील पेठ बीडमधील बलभीम नगरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (१५ मार्च) सायंकाळी सहा वाजता घडली. यावेळी घरांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड करण्यात आली. तलवारबाजीत काही जण गंभीर जखमी झाले. परस्परविरोधी तक्रारीवरून माजी पालिका सभापती रामसिंग टाकसह २० जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

माजी सभापती रामसिंग टाक यांच्या तक्रारीनुसार, बलभीमनगरात १५ रोजी सायंकाळी सहा वाजता शिवीगाळ करून कोयता, विटा, दगड व काठ्यांनी हल्ला चढवण्यात आला. घरावर दगडफेक केली तर वाहनांची तोडफोड करून तलवारीने हल्ला केला. याप्रकरणी सतीश तुसांबड, करण तुसांबड, सागर सौदा, रोहित उर्फ लल्ला सौदा, सुरेंद्र सौदा,शुभम उर्फ गोरा सौदा, मंगल तुसांबड, रेखा सौदा, कपिल सौदा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. दुसऱ्या गटाकडून सागर सौदा यांनीही तक्रार दिली. वराह चोरीवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत दगड, विटांनी घरांवर दगडफेक करून चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावरून राजू टाक, कुलदीप टाक, सोनू टाक, प्रदीप टाक, संदीप उर्फ काळू टाक, रामसिंग टाक, अनिता टाक, जागृती टाक व इतर दोन अनोळखींवर गुन्हा नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...