आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बीडला राहुल गांधींचा निषेध

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा बीडमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा महाराष्ट्रात असून विदर्भात असताना त्यांनी शेगावच्या सभेआधी एका पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल चुकीचे विधान केले. याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. भाजप, मनसेकडून याचा निषेध केला जात आहे. शनिवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला.

स्वा.सावरकर म्हणजे राष्ट्रभक्तीचे एक धगधगते अग्निकुंड आहेत. अशा महा पुरुषांबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना भारत भ्रमण करून त्यांनी केलेल्या कार्याचा कदाचित विसर पडलेला दिसतो अशा शब्दात अ.भा.वि.प.चे शहर मंत्री राधेय बाहेगव्हाण कर यांनी राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला.स्वा.सावरकर यांच्या कार्यावर आक्षेप नोंदवण्याआधी वास्तव समजून घ्यावे असे ते म्हणाले. यावेळी, राहुल गांधी विरोधात घोषणाबाजी करण्यात अाली. यावेळी शहर सहमंत्री स्वप्नील बगाडे, राघवेंद्र कुलकर्णी, शुभम खाटीकमारे, सिद्धार्थ वाघमारे, संविधान जावळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...