आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:परळीत बिंगो जुगारावर छापा; नऊ जुगाऱ्यांविरोधात गुन्हा

परळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पोलिसांनी बुधवारी मलीकपूरा ते वडसावित्रीनगर भागात सुरु असलेल्या बिंगो जुगारावर छापा मारुन ९ जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. या कारवाईत २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अलीम खान हबीब खान (२७, रा. मलीकपूरा), शेख मजहर शेख मोहम्मद (२४, रा. मलीकपूरा), सय्यद समीर सय्यद इलाही (३०, मलीकपूरा), एजाज कादर पठाण (३०, रा. मलीकपूरा), संजय बालाजी गायकवाड (२७, रा. सुभाष चौक), आकाश हांगरगे (२१, रा. सुभाष चौक), मुराद हमीद पठाण (२७, रा. शिवनगर), शेख अन्वर शेख बाबू यांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...