आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल जप्त:केजमध्ये जुगार अड्ड्यांवर छापा ; दोन्ही कारवाईतील 27 जणांवर गुन्हे

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केज शिवारात छापा मारून झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या दोघांना पकडले. पथकास पाहून १५ जण पळून गेले. केज ठाण्याच्या पथकाने उमरी शिवारात छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या ५ जणांना रंगेहाथ पकडले असून ५ जण पळून जाण्यात यशस्वी झाले. दोन्ही छाप्यात पोलिसांनी १ लाख २ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून २७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

उमरी शिवारात जुगार खेळत असल्याची माहिती केज ठाण्याचे सपाेनि. शंकर वाघमोडे यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार फौजदार राजेश पाटील, पोलिस नाईक दिलीप गित्ते, राजू गुंजाळ, त्रिंबक सोपणे, पोलिस शिपाई महादेव बहिरवाल, शमीम पाशा, बजरंग इंगोले यांच्या पथकाने मंगळवारी (२३ ऑगस्ट) रात्री ७.१५ वाजेच्या सुमारास छापा मारला. या वेळी युवराज आत्माराम मुळे, अनिल तात्याराव मुळे, अशोक नरहरी कसबे, बप्पा ऊर्फ पंढरी मनोहर राऊत, नरसिंग भास्कर मुळे यांना तिर्रट नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.

पोलिसांना पाहून इंदर साधुराम भैरट, विलास मगर मुळे, दिनकर अभिमान कसबे, खंडू अभिमान कसबे, भास्कर व्यंकट मुळे हे पाच जण पळून गेले. पकडलेल्या पाच जणांकडून जुगाराचे साहित्य, राेख १८ हजार ७४० रुपये, २ दुचाकी असा ५८,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस नाईक त्रिंबक सोपणेंच्या फिर्यादीवरून १० जणांवर गुन्हा दाखल केला. दुसऱ्या कारवाईत केज शिवारातील बळी यशवंत घुले यांच्या शेतातील घरासमोरील सुरू असलेल्या जुगारावर जमादार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी छापा मारला. राेख १८०० रुपये, २ मोबाइलसह ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जमादार बाबासाहेब बांगर यांच्या फिर्यादीवरून १७ जणांवर केज पोलिसांत गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...