आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:बीडमध्ये मटका अड्ड्यावर छापा; 14 जुगाऱ्यांवर गुन्हा, बालेपीर भागात शेडमधून सव्वा लाखाचा ऐवज जप्त

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नगर रोडवरील बालेपीर भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत १४ जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख व मोबाइल असा एकूण १ लाख २६ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ३१ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला.

शहरातील नगर रोड, बालेपीर भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सय्यद मुस्तफा सय्यद (वाहक) हा बेकायदेशीररीत्या काही लोकांना एकत्र बसून मिलन नाइट जुगाराचे आकड्यावर लोकांकडून पैसे लावून जुगार खेळ खेळवत आहे, अशी माहिती सहायक अधीक्षक कुमावतांना मिळाली. नंतर त्यांच्या मार्गदर्शनात पथकातील पोलिसांनी रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकला. त्या ठिकाणी मटका घेणाऱ्या व खेळणाऱ्या १० जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मटका जुगाराचे साहित्य, रोख व मोबाइल असा एकूण १ लाख २६ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत मटका घेणारे व खेळणारे लोक तसेच मूळ मालक अशा एकूण १४ जणांविरुद्ध पोलिस नाईक राजू वंजारे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई उपनिरीक्षक मनोज कुलकर्णी, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, सचिन अहंकारे, संजय टुले यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...