आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू नष्ट:दोन हातभट्ट्यांवर धाड; 1100 लिटर दारू नष्ट

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बोरखेड व लिंबागणेश हद्दीत सुरु असलेल्या गावठी दारूच्या अड्डयावर नेकनूर पोलिसांनी शनिवारी धाड टाकून ११०० लिटर रसायन नष्ट केले. सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने दारू पिऊन वाद होण्याची व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेण्याची शक्यता असते म्हणून पोलिस अधीक्षक ठाकूर यांनी कारवाया वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिवारी बोरखेड शिवारात सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे यांनी धाड टाकली. यावेळी श्रीहरी निवृत्ती पवार यांच्याकडे ३०० लिटर रसायन, लिंबागणेश पार्वती बाई अश्रुबा गायकवाड, जाईबाई रावण गायकवाड या दोन महिला गावठी हातभट्टी दारू तयार करत असताना येथे दोन ठिकाणी धाडी मारली असता प्रत्येकी ४०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे गुळ मिश्र फसफसते रसायन मिळुन आले. या तीन ठिकाणी एकूण अकराशे लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन मिळुन आले ते नष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...