आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळा:पावसाळ्याचे दिवस सुरू; आपत्ती व्यवस्थापन कक्ष अन‌ दूरध्वनीही बंदच

धारूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून वीज, वारा, पूर, आदी नैसर्गिक आपत्तीचा सामना या काळात नागरिकांना करावा लागतो.वेळीच ग्रामीण भागामध्ये ग्रामस्थांना प्रशासनाच्या मदतीची गरज असते. यासाठी तहसील कार्यालयामध्ये पावसाळ्यापुर्वी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येते.परंतु पावसाळ्याचे दिवस सुरू झाली तरीही अद्याप तहसील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आलेला नाही. शिवाय दूरध्वनी ही बंद आहे. यामुळे आपत्तीच्या वेळी कोणाकडे मदत मागायची असा प्रश्न आहे.

धारूर तालुका हा डोंगराळ परिसराने व्यापलेला आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर वीज, वारा, नद्यांना पूर, विद्युत तारा तुटणे यासह नैसर्गिक आपत्ती ओढवण्याची शक्यता अधिक असते. यावेळी ग्रामीण भागांमध्ये प्रशासनाच्या मदतीची गरज असते. नैसर्गिक संकट टाळण्यासाठी तसेच तात्काळ मदत मिळावी म्हणून दरवर्षी तहसील कार्यालयमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करून या ठिकाणी दूरध्वनी सुरू करण्यात येत असतो. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. तरी अद्याप तहसील कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करून अद्याप कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. यामुळे संकटकाळात नेमका कोणाशी संपर्क साधायचा असा प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...