आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:वंचित, उपेक्षितांचा आवाज बुलंद करणार ; कागदे

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित, उपेक्षितांच्या न्याय्य हक्कांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाने कायमच आग्रही भूमिका घेतलेली आहे. यापुढेही हा लढा सुरूच राहील, त्यासाठी त्यांचा आवाज बनून संघर्ष करत राहू. रिपाइं कार्यालयाच्या या उद्घाटनाला राजकीय, सामाजिक सर्वच क्षेत्रातील जवळपास चार हजार स्नेही जणांनी उपस्थिती लावली, हा आपुलकीचा स्नेह कायम असाच राहील, असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केले.शहरातील बशीर गंज येथे रिपाइंच्या अद्ययावत पक्ष कार्यालयाचे उद्घाटन पार पडले.

या वेळी उपस्थितांना संबोधित करताना पप्पू कागदे बोलत होते .दरम्यान, सुशीला मोराळे यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख उपस्थितीत भिक्खू धम्मशील, माजी आ. राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, माजी आ.सिराज देशमुख, मोईन मास्टर, अॅड. बाळासाहेब राख, समता परिषदेचे अॅड. सुभाष राऊत, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, अमर नाईकवाडे, एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष निजाम शेख, फारुख पटेल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर घुमरे, चंद्रकांत नवले, शिवराज बांगर, बाळासाहेब पिंगळे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद, प्रभाकर कोलंगडे अप्पा, सुहास पाटील, मनोज जाधव, सचिन कोटुळे, अनिल घुमरे, गंगाधर पुरी, शंकर जाधव, अर्जुन दळे, प्रकाश कानगावकर, संजय गुरव, आसाराम गायकवाड, गोरख रसाळ, विलास महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...