आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:राजाभाऊ फड हल्ला प्रकरण; 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी

राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्यावर हल्ला झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली होती. या प्रकरणी १६ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला गेला. कन्हेरवाडी येथील सरपंच व सदस्यपदाची रविवारी शांततेत निवडणूक पार पडली. मात्र, सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कन्हेरवाडी पॅनलचे प्रमुख माजी सरपंच व राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्यावर हल्ला झाला. तसेच त्यांचे दोन समर्थक जखमी झाले आहेत.

घटनास्थळी तातडीने पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परळी शहर पोलिस ठाण्यात भगवान मारोती फड, सतिश भगवान फड, राजेश माणिक फड, ॠषीकेश माणिक फड, फुलचंद फड, विकास मुंडे, सुदर्शन संतराम मुंडे, वाल्मिक लक्ष्मण मुंडे, गोविंद ज्ञानोबा फड, माणिक हरिश्चंद्र फड यांच्याविरुध्द खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...