आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते राजाभाऊ वरपेंचा सन्मान ; पीक विम्याबाबत उत्कृष्ट कार्य केल्याने गौरव

केज6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सोनीजवळा व लाखा या गावाच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजाभाऊ वरपे यांनी मागील वर्षीच्या हंगामात पीक कापणी प्रयोग व पीक विम्याबाबत उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

साळेगाव (ता. केज) येथील रहिवाशी असलेले राजाभाऊ वरपे हे लाखा व सोनीजवळा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सन २०२१-२२ च्या हंगामात पीक कापणी प्रयोग आणि पीक विम्याबाबत त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी उत्कृष्ट काम केले. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल जिल्हा स्तरावर घेऊन शुक्रवारी (ता. २९ जुलै) ग्रामविकास अधिकारी वरपे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या वेळी जिल्हा कृषी अधिकारी बी. के. जेजुरकर व जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष धनराज सोनवणे, उपाध्यक्ष शिवाजी पटाईत, सचिव ओम चोपणे, सहसचिव दत्तात्रय गव्हाणे यांच्यासह दोन्ही गावच्या सरपंचांनी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...