आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक‎:राजयाेग शिक्षिका ब्रह्माकुमारी‎ शिलूदिदी यांचे सामनेरात स्वागत‎

सामनेर‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे १०‎ रोजी सायंकाळी ७ वाजता माउंट‎ अबू येथील आंतरराष्ट्रीय राजयोग‎ शिक्षिका व शिक्षा विभागाच्या‎ उपाध्यक्षा ब्रह्माकुमारी शिलूदिदी‎ यांचे स्वागत करण्यात आले.‎ जळगाव येथून ब्रह्माकुमारी‎ शिलूदिदी यांचे सामनेर येथे आगमन‎ झाल्यानंतर त्यांची ब्रह्माकुमारी‎ केंद्रापर्यंत सवाद्य बग्गीतून मिरवणूक‎ काढण्यात आली. या वेळी‎ ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या‎ प्रांजलदिदी यांनी पुष्पगुच्छ देवून‎ त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी‎ शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत‎ गीतावर नृत्य सादर केले.

या वेळी‎ जळगाव येथील ब्रह्माकुमारी‎ मीनाक्षीदिदी , दीपाली बहेन, राजू‎ भाई यांचाही सत्कार केला.‎ ब्रह्माकुमारी शिलूदिदी यांनी‎ उपस्थितांना संबोधित करताना‎ तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे‎ आवाहन केले. तसेच शिवजींचे‎ स्मरण करून भगवंताजवळ‎ जाण्याच्या उपदेश दिला. प्रास्ताविक‎ रेखा बहेन यांनी केले, तर‎ प्रांजलदिदी यांनी आभार मानले. या‎ वेळी सामनेरचे ग्रामस्थ हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...