आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामकथा ही केवळ कथा नसून ही घराघराला मंदिर करणारी दिव्य पावन, अशी कथा आहे. रोज जसे अन्न लागते तसे कथा ही देखील अध्यात्मिक अन्न, पाणी आहे. जीवंत राहायचे त्यास या दोन्हीची आवश्यकता आहे. ही कथा जगणाऱ्या जगत जीवांना तारणाऱ्या पूज्य माऊलींच्या समाधीस्थळी श्रवण करण्याचे सद्भाग्य त्यांच्याच कृपेने लाभते आहे, असे उद्गार रामायणाचार्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर यांनी काढले.
श्री क्षेत्र चाकरवाडी येथे माऊलींच्या महाराज चाकरवाडीकर यांच्या समाधीस्थळी २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित राम कथे प्रसंगी ते बोलत होते. कथेच्या प्रारंभी महादेव महाराज आणि नारायण महाराज यांनी कथाकर्ते पाचपोर महाराजांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर बोलताना संजय महाराज पाचपोर म्हणाले, दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे माऊलींच्या पुण्यतिथी सोहळ्याचा नामसंकीर्तन सामूहिक कार्यक्रम होऊ शकला नाही.
आज २२ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त माऊलींचा दरबार दूरदूरहून आलेल्या सद्भक्तांनी पुन्हा भरून गेल्याची विभूती आली आहे. आपण कथा करण्यासाठी नाही तर माऊलींच्या सानिध्यात जे आनंद सुख लाभते, जे घेता यावे यासाठी आलो आहोत. रामकथा ही साऱ्यांनी ऐकली आहे. ती प्रत्येक मनुष्य जीवनाचा आरसा आहे. ती आपल्याला माणूस म्हणून घडविण्याची किमया करते. माऊली येथे राहतात, त्यांचे घर म्हणजे हे पावन मंदिर आहे. येथे आलेल्या सर्वांना आनंद मिळतोच व पुण्यही लाभते.“तुका म्हणे घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही” ही स्थिती प्राप्त होते. महाराष्ट्रात असा एकही वारकरी शोधून सापडणार नाही, की ज्याला हे चाकरवाडी तीर्थक्षेत्र ठाऊक नाही. चाकरवाडी येथे चिरंतन ऊर्जेचा एक ठेवा लाभतो, असेही याप्रसंगी संजय महाराज पाचपोर यांनी सांगितले. यावेळी भाविकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.