आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या वतीने ३ ते १२ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या शिबिरला मोठा प्रतिसाद मिळाला. न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी हे शहरातील शाळा व शालेय विद्यार्थ्यांसाठी सतत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवित असतात. याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे .
या समर कॅम्पमध्ये पाचशे विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला आहे. या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आऊटडोअर तथा इनडोअर खेळ खेळविली जात आहेत. विद्यार्थी घोडेस्वारी करतांना अत्यंत प्रफुल्लित होतांना दिसून येत आहेत. विविध प्रकारचे रंगीबेरंगी चित्र काढून त्यामध्ये रंग भरतांना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांसाठी अतिशय संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांचे आभार मानल्या जात आहे. न्यू व्हिजन स्कुलचे सर्व शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी मेहनत घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.