आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:रामपुरी घटनेचा खटला फास्ट ट्रॅक चालावा; ‘वंचित’चे निवेदन

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून केली गेली. शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेत निवेदन दिले.

गेवराई तालुक्यात तलवाडा पोलिस ठाणे हद्दीत रामपुरी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली होती. या घटनेनंतर विविध पक्ष, संघटनांकडून रोष व्यक्त केला जात आहे. बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या बीड जिल्हा कार्यकारिणीच्या शिष्टमंडळाने बीडचे प्रभारी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची या प्रकरणी भेट घेत चर्चा करून त्यांना निवेदन दिले.

या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते प्रा.विष्णू जाधव, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, सचिन उजगरे अंकुश बलया, बबनराव वडमारे, पुष्पा तुरुकमाने, अनुरथ वीर, दगडू गायकवाड, यूनुस शेख, भीमराव चव्हाण, डॉ गणेश खेमाडे आधी पदाधिकारी होते. या वेळी शिष्टमंडळाने या प्रकरणात आरोपी फरार असून आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली पाहिजे, शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, पिडीतेला मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी केली गेली.

बातम्या आणखी आहेत...