आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कनकालेश्वर महोत्सव:तरंगत्या रंगमंचावर बीडमध्ये रंगला कनकालेश्वर महोत्सव; गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त महोत्सव

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त शहरातील कनकालेश्वर मंदिराच्या पाण्यावरील तरंगत्या रंगमंचावर २६ वा महोत्सव रंगला. शनिवारी रात्री ८ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागरांच्या हस्ते झाले. या वेळी संस्कार भारती देवगिरी प्रांताचे अध्यक्ष भरत लोळगे, भगवान देशमुख उपस्थित होते. औरंगाबाद येथील नृत्यसुधा डान्स अकॅडमीच्या प्राजक्ता आपोनारायण व त्यांच्या टीमने नृत्याविष्कार सादर केला. तर जिल्ह्यातील प्रभाकर साळेगावकर, श्रावण गिरी, डॉ. मुकुंद राजपंखे, राजेसाहेब कदम या कवींनी बीडकरांना मंत्रमुग्ध केले.

क्रांतिकारकांना केला मानाचा मुजरा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कनकालेश्वर महोत्सवात संस्कार भारतीच्या वतीने क्रांतिकारकांना मानाचा मुजरा घालण्यात आला. समारोपात कनकालेश्वर मंदिरावर उपस्थित मान्यवर व रसिकांवरही पुष्पवृष्टी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...