आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा‎:प्री प्रायमरी आणि शांतिनिकेतन इंग्लिश‎ स्कूलमध्ये रंगला आजी-आजोबा मेळावा‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियदर्शनी महिला वा ग्रामीण बहुउद्देशीय‎ सेवाभावी संस्थेच्या प्री प्रायमरी आणि शांतिनिकेतन‎ इंग्लिश स्कूल येथे रविवारी आजी आजोबा मेळावा‎ झाला. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये संयुक्त‎ कुटुंब पद्धती, त्यातील आजी-आजोबांचं असणार‎ स्थान, तसेच इतर नातेसंबंध यांचे महत्त्व अवगत‎ व्हावे याकरिता शाळेच्या वतीने या आगळ्यावेगळ्या‎ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विनायक‎ वैद्य हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा‎ म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या संचालक‎ तसेच अध्यक्षा वैशाली जाधव उपस्थित होत्या.

या‎ कार्यक्रमात आजी आजोबांसाठी संगीत खुर्ची,‎ मनोगत व्यक्त करणे, लकी ड्रॉ तसेच पालकांनी‎ भारुडे, गवळणी, अभंग, सादर केले. आजोबांनी‎ रस्सीखेच या स्पर्धेत आजींना मागे टाकून प्रथम‎ क्रमांक पटकावला आणि आपल्या बाल जीवनातील‎ अनुभवांना या ठिकाणी उजाळा दिला.‎ आजी-आजोबांचा उत्साह पाहून शाळेतील विद्यार्थी‎ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रभावित झाले.‎ या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने समूह नृत्य‎ नाटिका आणि विविध कला गुण सादर केले. वर्षा‎ कुलकर्णी यांनी कविता सादर केली. सूत्रसंचालन‎ ओंकार दूनघव, प्रफुल चौधरी, तहूरा शेख, जान्हवी‎ देशपांडे यांनी केले. आभार निशिगंधा अबू यांनी‎ मानले. प्राचार्य अनिल जोशी, उप प्राचार्य विवेकानंद‎ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎

बातम्या आणखी आहेत...