आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिगर शहादा तालुक्यातील वैजाली येथील माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्षानिमित्त कृषी विभाग शहादा च्या वतीने वैभव माध्यमिक विद्यालय वैजाली येथे चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली शहादा कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्षा निमित्त वैभव विद्यालय वैजाली येथे शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष’ म्हणून जगभरात साजरे केले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये कलेच्या माध्यमातून जनजागृती निर्माण व्हावी यासाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. आहारातील पौष्टिक तृण धान्याचे महत्त्व या विषयावर आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना कृषी विभागाने प्रशस्तीपत्र व रोख स्वरूपात बक्षीस दिले. स्पर्धेसाठी उपविभागीय कृषी अधिकारी तानाजीराव खर्डे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.