आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Beed
  • Rape | Chiid Sexual Case | Beed | Marathi News | Accused Of Child Sexual Abuse Sentenced To Life Imprisonment; Punishment Given By Majalgaon Sessions Court, Also 26 Thousand Fine

आजन्म कारावास:बाललैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला आजन्म कारावास; माजलगाव सत्र न्यायालयाने दिली शिक्षा, 26 हजार दंडही

माजलगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवून माजलगाव सत्र न्यायालयाने आजन्म कारावास व २६ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. अपर सत्र न्या. संतोष देशमुख यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. माजलगाव तालुक्यातील एका गावातील साडेआठ वर्षांची मुलगी १३ जुलै २०२१ रोजी खेळण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडे गेली असता मैत्रिणीच्या काकाने पुतणीला काही काम सांगून घराबाहेर पाठवले आणि साडेआठ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. पीडितेने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर माजलगाव ग्रामीण ठाण्यात पुरुषोत्तम घाटूळ या आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता.

तपास पोलिस उपअधीक्षक सुरेश पाटील व सहायक पोलिस निरीक्षक नीता गायकवाड यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. अपर सत्र न्या.देशमुख यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. यात पीडितेच्या आईची तक्रार, पीडितेचा जबाब, तिच्या विडलांचा, आजोबांचा जबाब, वैद्यकीय तपासणी अहवाल, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जबाब महत्वाचा ठरला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. मिलिंद वाघिरकर यांनी युक्तिवाद केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संतोष देशमुख यांनी आरोपीला दोषी धरून आईचीजन्म कारावास व २६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वाघिरकर यांना सहायक सरकारी अभियोक्ता रणजित वाघमारे यांनी सहकार्य करून सरकार पक्षाची बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...