आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:पतीकडे सोडण्याच्या बहाण्याने महिलेवर 24 दिवस अत्याचार; ऊसतोड मुकादमावर गुन्हा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कौटुंबिक कलहातून महिला दोन वर्षांपासून माहेरी राहत होती

दोन वर्षांपासून पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला पतीकडे सोडण्याच्या बहाण्याने एकाने किरायाच्या खोलीत ठेवून जिवे मारण्याची धमकी देत २४ दिवस अत्याचार केल्याची घटना शहरातील आदर्शनगर भागात उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सोमवारी (दि.२६) बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

पीडित महिला बीड तालुक्यातील एका गावची रहिवासी आहे. तिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिला तीन वर्षांची एक मुलगी आहे. कौटुंबिक कलहातून पतीने सासरी नांदवण्यास नकार दिल्याने ती दोन वर्षांपासून माहेरी राहत आहे. दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी ‘तुला तुझ्या पतीकडे सोडतो’ असा बहाणा करून ऊसतोड मुकादम असलेल्या राजेश छगन राठोड (रा. अंथरवणपिंप्री, ता. बीड) हा महिलेसह तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह घेऊन बीडला आला. बसस्थानकात रात्री मुंबईला जाण्यासाठी बस नसल्याने आजच्या दिवस किरायाच्या खोलीत राहू, असे सांगून तो तिला आदर्शनगरात घेऊन आला. किरायाच्या खोलीत त्याने त्या रात्री तिच्यावर बळजबरी केली. तिने विरोध केल्यावर तुझ्यासह तुझ्या मुलीला जिवे मारीन, अशी धमकी दिली. १ ते २४ ऑक्टोबरपर्यंत त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मंगळवारी पीडितेने शिवाजीनगर ठाणे गाठून तक्रार दिली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात राजेश राठोडवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला.

आरोपी फरार असून तपास सुरू असल्याचे सहायक पाेलिस निरीक्षक राहुल कोलते यांनी सांगितले.