आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:रासेयो शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी खुले व्यासपीठ; मानवलोकचे संचालक अमन लोहियांचे प्रतिपादन, रासेयो शिबिराचा समारोप

दिंद्रुड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय सेवा योजना ही श्रमसंस्कार देणारी संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारे एक व्यासपीठ आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आमला गाव पाणीदार होण्यास मदत झाली. तसेच यापुढेही आमला गाव समृद्ध ग्राम ठरेल आणि यात राष्ट्रीय सेवा योजनेचा सहभाग असेल, असा विश्वास मानवलोकचे संचालक अमन लोहिया यांनी व्यक्त केला.

सिरसाळा येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय, पाणी फाऊंडेशन व आमला ग्रामपंचायत यांच्या वतीने २६ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत मौजे आमला (ता. धारूर) येथे रासेयो शिबिर घेण्यात आले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एच पी.कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवलोक अंबाजोगाईचे संचालक अमन लोहिया व कार्यकारी अधिकारी लालासाहेब आगळे हजर होते.

कार्यक्रमाधिकारी डॉ. जयदीप सोळुंके यांनी सात दिवसीय शिबिराचे अहवाल वाचन व प्रास्ताविक केले. याप्रसंगी बोलताना अमन लोहिया यांनी त्यांनी व्यक्त केला. लालासाहेब आगळे यांनी एनएसएसचे स्वयंसेवक हे ग्रामदूत आहेत. त्यांच्या माध्यमातून खेडी स्वयंपूर्ण व समृद्ध होत आहेत आणि यापुढेही आमला गाव ग्रामसमृद्धी योजनेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेकडे आपल्या जीवनाला दिशा देणारे साधन या दृष्टीने पाहिले पाहिजे, असेही अागळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. कदम यांनी केला. या शिबिराच्या माध्यमातून सात दिवसात स्वयंसेवक ग्रामस्थ व पाणी फाउंडेशनच्या दूतांनी संपूर्ण गाव स्वच्छ केला, नालेसफाई, वृक्षांना आळी करणे तसेच संपूर्ण गावात आरोग्य साक्षरता विषयक सर्वेक्षण करणे, शिवारफेरी असे विविध उपक्रम राबवले. यावेळी विद्यार्थी, ग्रामस्थांनीही या शिबिरात सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...