आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएनसीसी विभाग तन-मन-धनाने दिवस-रात्र मेहनत करून छात्र सैनिकांसाठी विविध उपक्रम राबवतो. युवक, युवतींना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सामाजिक जाणीव करून देण्याचे काम एनसीसीच्या विविध उपक्रमांतून होते. राष्ट्रप्रेम, शिस्त, संघटन या बाबींची जाणीव छात्र सेनेतून होऊन विद्यार्थ्यांना संरक्षण दलात सहभागाची दिशा मिळते, असे प्रतिपादन प्रा.एन.के.गोळेगांवक र यांनी केले. येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेतील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील माजी छात्र सैनिकांचा प्रभाकर तात्या प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोळेगांवरकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.माणिकराव लोमटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक लंकेश वैद्य, मेजर एस.पी.कुलकर्णी, पत्रकार रवींद्र मठपती, भागवत मसने यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना गोळेगांवकर म्हणाले, विद्यार्थ्यांची जडणघडण ही त्यांना विकासाच्या दिशेने नेण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे शालेय जीवनापासून पालक, शिक्षकांचे विद्यार्थ्यांवरील लक्ष महत्वाचे आहे. यादृष्टीने आपण सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे. एनसीसी नेमके हेच काम करत असून राष्ट्राची सेवा करणारी पिढी घडवत आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रा.माणिकराव लोंमटे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी एनसीसीच्या माध्यमातून योगेश्वरी शिक्षण संस्थेतील मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांनी विशेष मेहनत घेतली. या मुलांतील कौशल्यांना पुढे आणून नैतिक मुल्यांची रूजवण करत खऱ्या अर्थाने राष्ट्र संरक्षणाच्या कामी येणारी पिढी घडवण्याचे काम एनसीसी अंबाजोगाई विभागाने केले आहे. मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांनीही याप्रसंगी ३२ वर्षातील वाटचाल स्पष्ट केली. माजी छात्र सैनिक रचना परदेशी, ऋचा कुलकर्णी व ओंकार रापतवार यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करत एनसीसीमुळे स्वत:च्या व्यक्तीमत्त्वात झालेल्या बदलांची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भागवत मसने यांनी केले.
या माजी छात्र सैनिकांचा सन्मान माजी छात्र सैनिक व सध्या पुणे विद्यापीठात डिफेन्समध्ये पीएचडी करणारी विद्यार्थिनी रचना परदेशी, राज्यस्तरीय नाटकामध्ये विशेष प्राविण्य मिळवणारी ऋचा कुलकर्णी व नव संगीतकार म्हणून ख्याती मिळवलेल्या ओंकार रापतवार या माजी छात्र सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या माजी छात्र सैनिकांनी एनसीसीच्या अनुभवांची शिदोरी कायम कामी येत असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.