आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पाण्यासाठी कन्हेरवाडीकरांचे परळीत रास्ता रोको आंदोलन

परळी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्हेरवाडी गावामध्ये पाण्याची पातळी व पाण्याचा स्रोत अत्यंत कमी झालेला आहे. गावातील नागरिकांना पिण्यासाठी व वापरासाठी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. गावातील पाळीव गुरे व जनावरे यांनासुद्धा पाण्याची अत्यंत पिण्यासाठी पाण्याची निकडीची गरज आहे. कडक उन्हाळा भासत असल्यामुळे नदीमध्ये पाणी सोडावे या मागणीसाठी कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी परळी- अंबाजोगाई मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

कन्हेरवाडी लघु तलावात सध्या भरपुर पाणीसाठा आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यास कन्हेरवाडी, बरोबर बँक कॉलनी, जलालपूर, शंकर-पार्वतीनगर, समतानगर, जिरेवाडी, इंदपवाडी, ब्रह्मवाडी या भागातील पाणीपातळीमध्ये वाढ होते. सध्या या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने कन्हेरवाडी तलावातील पाणी नदीपात्रात सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल यासाठी कन्हेरवाडी लघुसिंचन तलाव धरणातील पाणी कन्हेरवाडी नदीपात्रात सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती, परंतु अद्याप साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे सरपंच राजेभाऊ फड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...