आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागहू व तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जाणारे ३ ट्रक सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बुधवारी सकाळी सात वाजता शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील परभणी टी पॉईंटवर पकडला. (एमएच-२६,७७१७) व (एमएच-१२ ६७९५) क्रमांकाचे हे २ ट्रक गहू व तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जात असल्याची माहिती मिळताच बुधवारी सकाळी पोलिसांनी दोन्ही ट्रकची झडती घेतली.
एका ट्रकमध्ये २० टन गहू आणि दुसऱ्या ट्रकमध्ये रेशनचा वीस टन तांदूळ आढळून आला. दोन्ही ट्रकसह तीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ट्रकचालक प्रभाकर पिराजी गायकवाड (रा. धनज खुर्द, ता. लोहा, जि. नांदेड) व नवनाथ जीवन अंकुशे (रा. अस्ताला ता. धारूर, जि. बीड) यांना ताब्यात घेतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.