आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्थापन:रेपेवाडी शालेय व्यवस्थापन समितीची फेरनिवड, 31 हजारांची शाळेस मदत

धारूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा प्राथमिक शाळा रेपेवाडी येथे शालेय व्यवस्थापन समितीची फेरनिवड करण्यात आली.अध्यक्षपदी निवृत्ती रेपे तर उपाध्यक्षपदी अश्विनी शरद शेंडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नूतन अध्यक्षांनी दहा हजार तर उपाध्यक्षांनी पाच हजार व उर्वरित सदस्य सुनीता बालासाहेब ठाकरे, यशोदा गजानन मोरे, मनोज मोरे, राधा भीमराज सावंत, बाळासाहेब खिल्लारे, अंबादास रेपे, शिवाजी करनर, शिक्षण प्रेमी सदस्य संतोष रेपे यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये शाळा विकासासाठी दिले. मुख्याध्यापक रमेश रुद्रे व सहशिक्षक अर्जुन मंदे यांनी शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...