आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्नांना वाचा:मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत प्रश्नांना वाचा; अंतर्गत रस्ते, पाणी, नाली स्वच्छतेवर काम करा

बिड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक दिव्य मराठीच्या वतीने रविवारी (ता.१९ जून) दुपारी २ ते ४ वाजेदरम्यान भगवान जिव्हेश्वर मंदिरात प्रभाग क्रमांक पाचमध्ये ‘रूबरू’ (जनतेच्या समस्या थेट प्रशासनासमोर) या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत प्रश्नांना वाचा फोडली. अंतर्गत रस्ते, पाणीप्रश्न, स्वच्छता, वाहतुकीआड येणारे वीजखांब आणि विविध प्रश्न मुख्याधिकारी उमेश ढाकणे, नगरसेवक सम्राट चौव्हाण, राणा चौव्हाण यांच्यासमोर नोंदवले गेले तसेच ते मार्गी लागण्याचा विश्वासही मिळाला.

पथदिवे नसल्याने रात्री नागरिकांना त्रास, शनिवार पेठ रस्त्याचे काय?
गेल्या वर्षभरापासून आमच्या परिसरात वीजेचा प्रश्न आहे. पथदिवे नसल्याने रात्री त्रास होतो. स्वच्छता कर्मचारी नालीतील घाण काढून नेणे अपेक्षित आहे. पण ते नेत नाहीत. आम्हाला पैसे मागतात. आम्ही कुठून पैसे देणार? असा सवाल चंदारे अवधूत यांनी विचारला तर शनिवार पेठ गल्लीतील रहिवासी सुमनबाई चौहाण यांनी इतर ठिकाणचे रस्ते झाले. मात्र, आमच्या भागातील रस्ता प्रश्नाचे काय? असा सवालही याप्रसंगी रोखठोकपणे विचारला.

स्वच्छतेवर भर द्यावा, तुंबलेल्या नाल्यांचा प्रश्न तत्काळ सोडवावा
नियमित स्वच्छता नसल्याने अनेक प्रश्न आहेत. तुंबलेल्या नाल्यांचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिक घसरून पडतात. त्यामुळे स्वच्छतेवर भर देण्यासह पाणीही नियमित व पुरेसे मिळेल, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजेच.’लक्ष्मी संतोष मुळे, नागरिक, हिरालाल चौक.

दर चौथ्या दिवशी पाणी देणार, स्वच्छतेसाठी कोणी पैसे मागत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई; क्राँसिंग रस्त्यांच्या ठिकाणी नव्याने काम करू
स्वच्छतेसाठी कोणीही पैसे मागत असेल तर तक्रार करा, ठोस कारवाई करू. अमृत योजनेच्या माध्यमातून चांगल्या पध्दतीने पाणी देण्याचे नियोजन सुरु आहे. अमृत योजनेचे काम होताच दोन महिन्यांनंतर दर चौथ्या दिवशी पाणी देऊ. श्री भगवान जिव्हेश्वर मंदिराच्या सभागृहाच्या स्वच्छतागृहासाठी पाठपुरावा करणार असून येथील आऊटलेटही तातडीने काढून देणार आहोत. या भागातील ओपन स्पेसमध्ये जीम सुरु करण्यासाठी नव्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये प्रस्ताव दिला जाईल. यासह पालखीमार्गातील अडथळे दूर केले जातील. महापुरुष पुतळ्यांची नियमित स्वच्छता करण्यासह मुख्य रस्ता गल्लीला जोडणाऱ्या ठिकाणी क्रॉसिंग रस्त्यांचे काम करण्यासाठी टेंडर काढण्यात येणार आहे.’उमेश ढाकणे, मुख्याधिकारी, नगर परिषद, बीड

पाण्याचा प्रश्न सोडवा, विकत पाणी घेण्याची आमच्यावर वेळ
साळगल्ली भागातील पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. जलवाहिनी प्रत्येक ठिकाणी पोचवून पुरेसे पाणी द्यावे. सद्या आम्हाला पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे हा प्रश्न दूर करत गृहिणींचा त्रास लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सोडवावा.’प्रभावती जाधव, नागरिक, साळगल्ली.

रस्त्यावरील खडी उघडी पडली, छोट्या गल्ल्यांत स्वच्छतेचा विसर
प्रभाग ५ जुन्या बीडचा भाग आहे. छोटछोट्या गल्ल्या असल्याने इथे स्वच्छता व अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न आहे. नाल्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडलेली आहे. ही कामे व्हावीत. पावसाळ्यात स्वच्छतेच्या कामांवर भर राहणे आवश्यक आहे. राजू आतकरे, नागरिक, बुरूड गल्ली

तुंबलेल्या नाल्या, अस्वच्छतेमुळे विंचू काट्याचा धोका, समस्या दूर करावी
आमच्या भागात अंतर्गत रस्ता झालेला नाही. यासोबतच नाली काढण्यासाठी येणारे कर्मचारी पैसे मागतात. न दिल्यास काम करत नाहीत. अस्वच्छतेमुळे या भागात विंचुकाट्याचा धोका उद््भवतो. लहान मुले इथे वावरतात. प्रशासनाने याविषयाकडे लक्ष दिले पाहिजे. संगीता कळंबकर, राजपूत गल्ली, बीड

बातम्या आणखी आहेत...