आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:विद्यालयाचा नुकताच निकाल; वसंतराव नाईक विद्यालयाचा निकाल 94

पाटोदा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टक्केपाटोदा येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या निकालामध्ये या विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयाचा निकाल ९४ टक्के इतका लागला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य तुकाराम तुपे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाचा एकूण निकाल ९४ टक्के असा प्राप्त झाला असून विज्ञान शाखेचा निकाल ९३.९३ टक्के लागला.

यामध्ये प्रथम अभिजीत शिवाजी चव्हाण ८६.८३ टक्क्के, विशाखा विश्वनाथ गव्हाणे ८६.१७ टक्के, वैष्णवी अरुण अंकुशे ८६ टक्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. कनिष्ठ महाविद्यालयातून विशेष प्रावीण्य असलेले १९ विद्यार्थी तर अन्य विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ८९.६५ टक्के लागला असून यात प्रमोद हनुमंत देवकते ७४.६५ टक्के, उमेश विष्णू गर्जे ७३.५० टक्के, कोमल सुरेश बनसोडे ७३ टक्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

विशेष प्राविण्य असलेले यामध्ये तीन तर प्रथम श्रेणीमध्ये १७ विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. तसेच व्यवसाय अभ्यासक्रम एमसीवीसी शाखेचा निकाल ९५.९५ टक्के लागला आहे. ओंकार रामेश्वर काळे, पृथ्वीराज धनराज सानप, आदित्य अशोक बिराजदार यांनी यश प्राप्त केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव रामकृष्ण बांगर, मार्गदर्शिका सत्यभामा बांगर, युवा नेतृत्व विजयसिंह बांगर, महाविद्यालयाचे प्राचार्य तुकाराम तुपे, पर्यवेक्षक सुनील मस्कर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...