आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाखर हंगामामध्ये इतर जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड कामगारांना स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त धान्य पुरवठा केला जावा यासाठी साखर कारखान्याच्या स्थळावर शिबिर घेऊन नोंद करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ऊसतोड कामगार बाबत विविध योजनांच्या अंमलबजावणी अनुषंगाने बैठक झाली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख , उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानोबा मोकाटे , प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी विलास पाटील, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजकुमार शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, ऊसतोड कामगारांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी त्यांचे नोंदणी होणे गरजेचे असून ग्रामपंचायत निवडणुका नंतर येणाऱ्या ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊन त्यास मान्यता दिली जावी. जिल्ह्यातील कारखान्यांवर आलेल्या ऊसतोड कामगारांना साखर कारखाने यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांनी वैद्यकीय तपासणी शिबिर घ्यावे तसेच रेशन वरील धान्य मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र तसेच कुठे नोंद करावी याबाबतचे सविस्तर माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा पुरवठा विभागातर्फे दिली जावी असे ते म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा आरोग्य विभागामार्फत जवळपास ३५हजार ८९० महिला ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती अशी माहिती देण्यात आली तसेच चालू असलेल्या साखर हंगामासाठी जिल्ह्यातून गेलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वस्तीग्रह सुरुवात करण्यात आली असून शिक्षण विभागा मार्फत त्यामध्ये २७ हजार २९० मुलांना सुविधा देण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.