आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:अग्निवीर वायूसाठी‎ भरती प्रक्रिया सुरू‎‎

‎बीड‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन एअरफोर्सच्या वतीने‎ अग्निवीर वायू भरतीसाठी अर्ज‎ प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.‎ योग्य पात्रता असलेल्या युवकांना‎ पंधरा दिवसांचा अवधी ऑनलाइन‎ अर्ज करण्यासाठी मिळेल. ३१‎ मार्चपर्यंत अर्ज करता येतील.‎ अग्निवीर वायूमध्ये भरती‎ झाल्यावर तरुणांना चार वर्षांसाठी‎ काम करता येईल. त्यानंतर जर‎ इंडियन एअरफोर्सच्या वतीने‎ आवश्यक पॉलिसीनुसार अग्निवीर‎ इंडियन एअरफोर्स नियमित केडर‎ एअरमन म्हणून निवड होण्याची‎ संधी मिळू शकते.‎

यात केंद्रीय यादी तयार करण्यात‎ येईल. निवडीसाठी क्रायटेरिया‎ तयार केला जाईल. त्यानंतर चार‎ वर्षांच्या परफॉर्मन्सनुसार २५ टक्के‎ अग्निवीर वायू नियमित केडरमध्ये‎ सहभागी केले जाऊ शकतील.‎ यासाठी २० मे रोजी परीक्षा होईल.‎ उमेदवाराची कॉर्नियल सर्जरी जसे‎ की पीआरके (फोटोरिफ्रेक्टिव्ह‎ केराटेक्टोमी) किंवा लेसिक केली‎ असल्यास अग्निवीर वायूसाठी‎ पात्र नसतील. त्यामुळे अशा‎ उमेदवारांनी अर्ज करू नये.‎ इच्छुक उमेदवारांनी खालील‎ संकेतस्थळ पाहावे.‎ https:agnipathvayu.c‎ dac.in‎

बातम्या आणखी आहेत...